spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! फटाक्यामुळे घराला आग, 'या' परिसरात मोठा गोंधळ

अहमदनगर ब्रेकिंग ! फटाक्यामुळे घराला आग, ‘या’ परिसरात मोठा गोंधळ

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : दिवाळी व फटाके हे माथे समीकरण जुळलेलं आहे. परंतु बऱ्याचदा फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटनाही घडतात.

आता अहमदनगरमध्येही अशीच एक घटना घडली. ऐन दिवाळीत रविवारी सायंकाळी सावेडी परिसरातील नागरिक लक्ष्मीपूजन करत असताना आगीची घटना घडली.

सावेडी परिसरातील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही. अग्निशमन दलाने तातडीने येऊन ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

फटाक्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिक संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत लवकर येऊन ही आग त्वरित विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...