spot_img
देशरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ! दिग्गजांचा विक्रम मोडला , पहा काय केले

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ! दिग्गजांचा विक्रम मोडला , पहा काय केले

spot_img

नगर सह्याद्री टीम : सध्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारत अद्याप एकही मॅच हरलेले नाही. दरम्यान नेदरलँड्सविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. व ७व्या षटकात षटकार ठोकत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ११ सामन्यांत ४६५ धावा केल्या होत्या. रोहितच्या नावावर ४४२ धावा असून गांगुलीला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २४ धावांची गरज होती आणि त्याने तोही विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून १४ हजार धावांचा टप्पाही त्याने आज ओलांडला. त्याच्यापुढे आता फक्त 15758 – वीरेंद्र सेहवाग 15335 – सचिन तेंडुलकर हे दोघे आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही रोहितने या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला आणि २०१९मध्ये इयॉन मॉर्गनचा २२ षटकारांचा विक्रम त्याने मोडला.

रोहितने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या २४ वन डे सामन्यांमध्ये एकूण ५८ षटकार मारले आहेत आणि आजच्या सामन्यात त्याने १ षटकार खेचून एका कॅलेंडर वर्षात वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला. त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. एबीनने २०१५ मध्ये २० वन डेमध्ये ५८ षटकार मारले होते आणि रोहितने २०२३ मध्ये ५८ षटकार खेचले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...