spot_img
ब्रेकिंगमंत्री विखेंचा जनता दरबार ! सर्वच राजकारण्यांना केले 'हे' मोठे आवाहन

मंत्री विखेंचा जनता दरबार ! सर्वच राजकारण्यांना केले ‘हे’ मोठे आवाहन

spot_img

लोणी। नगर सहयाद्री –

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्‍ह्यासह संपूर्ण राज्‍यातून मोठ्या संख्‍येने आलेल्‍या नागरीकांचे अर्ज स्विकारुन त्‍यांच्‍या समस्‍या त्‍यांनी जाणून घेतल्‍या. तसेच विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांशीही चर्चा करुन, त्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत शासन स्‍तरावर पाटपुरवा करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

जनता दरबार ही विखे पाटील यांची संकल्‍पना गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरु आहे. सत्‍ता असो अथवा नसो नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी महीन्‍यातून एक वेळा मंत्री विखे पाटील जनता दरबारचे आयोजन करुन नागरीकांशी संवाद साधत असतात. सर्वच शासकीय विभागांचे आधिकारीही उपस्थित राहून, नागरीकांच्‍या प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय करतात. या जनता दरबारातील या संवादात्‍मक प्रक्रीयेतून नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मोठी मदत होते.

महसूल मंत्री झाल्‍यानंतर मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षभरात १० जनता दरबार आयोजित केले. यापैकी नगर, राहाता, राहुरी या ठिकाणी ३ जनता दरबार झाले. या जनता दरबारच्‍या माध्‍यमातून वर्षभरात १७ हजार ३०४ अर्ज स्विकारण्‍यात आले. यापैकी ९ हजार २७६ अर्जांवर कार्यवाही होऊन त्‍यांची उत्‍तरही वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून नागरीकांना मिळाले आहेत. उर्वरित ८ हजार २८ अर्ज प्रक्रीयेमध्‍ये असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्राप्‍त होणा-या अर्जांवर माझ्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्‍याने पाठपुरावा होतो. संबधित अर्जदाराला पत्रही दिले जाते. शासकीय कार्यालयांकडे पाठविलेल्‍या अर्जांवर झालेल्‍या कार्यवाहीचा पाठपुरावाही होत असल्‍याने नागरीकांची कामे मार्गी लावण्‍यात मोठी मदत होते. शासकीय कार्यालयांमधून प्रत्‍येक अर्जावर होणा-या कार्यवाहीचा रिपोर्टही दर महिन्‍याला आपण मागवत असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...