spot_img
अहमदनगरआमदार निलेश लंकेंना अटक होताच पारनेर तापले, समर्थक आक्रमक...

आमदार निलेश लंकेंना अटक होताच पारनेर तापले, समर्थक आक्रमक…

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून सरकारचे लक्ष वेधणाऱ्या आ. नीलेश लंके यांच्यासह त्यांच्या सहकारी मराठा आमदारांना अटक करण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद तालुक्यात उमटले आहेत.पारनेर तालुका राष्ट्रवादी काँगे्स, नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने तहसिलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन देण्यात येउन निषेध नोंदविण्यात आला. आ. लंके यांच्यावर पुन्हा अटकेची कारवाई करण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यासंदर्भात तहसिलदार सैंदाणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलने, उपोषणे करण्यात येत आहेत. जालना जिल्हयातील आंतरवाली सराटी या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयाबाहेर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह इतर मराइा आमदारांना सरकारने अटक केली असून या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

आरक्षण हा आमचा हक्क असून त्याची मागणी करणे यात चुकीचे काय आहे ? असा सवाल करून मराठा आरक्षणासाठी केवळ चर्चा करून निर्णय होणार नाही तर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे व या अधिवेशनात यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन तोडगा काढण्यात यावा व मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे. देशभर मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असल्याचे नमुद करून आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सरकार कोणाचे.. यापेक्षा आरक्षण महत्त्वाचाचे

मराठा आरक्षणासाठी शासनाच्या वतीने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. समाजबांधवांच्या भावना शासन दरबारी पोहचविण्यासाठी आ. लंके यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. असे करताना सरकारने त्यांना अटक केली. या अटकेचा पारनेर-नगर मतदारसंघातील मायबाप जनतेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. आम्हाला प्रश्‍न विचारला जातो की तुम्ही सरकारमध्ये आहात. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्व जनतेला आणि हा प्रश्‍न विचारणारांना एकच सांगू इच्छितो माझ्या मराठा समाजाला कायमस्वरूपी टीकणारे, विनाअट आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्हाला या सरकारचे काही घेणे देणे नाही. या सरकारचा आम्ही निषेध करतो.
-बाबाजी तरटे ( तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...