spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी 'या' अभिनेत्रीनी केला 'शिवनेरीवर' अभिषेक

जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी ‘या’ अभिनेत्रीनी केला ‘शिवनेरीवर’ अभिषेक

spot_img

सुपा। नगर सह्याद्री

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलनाला अनेक जाती-धर्माच्या लोकांनी पाठींबा दिला असून सध्या गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती, पण सरकार शब्दाला जागले नाही. त्यानंतर ४० व्या दिवशी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केले. आणि त्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

जरांगे पाटील यांनी समाजासाठी अन्न,पाण्याचा त्याग केला आहे, त्यांची प्रकृती सध्या खूप खालावली आहे. त्यांची हाक सरकारला समजावी, त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि त्यांच्या आरोग्यासाठी चित्रपट सृष्टीही पुढे सरसावली आहे. सिने अभिनेत्री अश्विनी इरोळे यांनी ३१ ऑक्टोबर रोजीशिवनेरी गडावर शिवाई देवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून, महाआरती करून जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

यावेळीअश्वयुग महिला मंचच्या सदस्या सुरेखा पोटघन, सोनिया चौधरी, रोहिणी वाळके, स्वाती शेळके, कविता जर्‍हाड, जयश्री नवले तसेच मच्छिंद्र रसाळ, गौरव म्हस्के,भरत घावटे, लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे, सोमनाथ शेळके, सादिक शेख असे अनेक जाती-धर्माच्या लोकांनी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक महाआरती आणि प्रार्थना केली प्रार्थना करताना सर्वच जण भावूक झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...