spot_img
आर्थिकLPG सिलेंडर बुक करताच मिळेल ५० लाखांचा विमा, एक रुपयाही लागत नाही

LPG सिलेंडर बुक करताच मिळेल ५० लाखांचा विमा, एक रुपयाही लागत नाही

spot_img

नगर सह्याद्री टीम : आजकाल सर्वांच्याच घरात एलपीजी सिलिंडर आहे. सर्वचजण आपण महिना दोन महिन्याला गॅस सिलेंडर रिफील करतोच. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की या सिलेंडरवर तुम्हाला सरकारकडून 50 लाख रुपयांचा बेनिफिट मिळतो.

देशातील सरकारी तेल कंपन्या एलपीजी वापरणाऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे गॅस सिलिंडर विमा संरक्षण देतात. तुम्ही सिलिंडर बुक करताच तुमच्या कुटुंबाला हा विमा मिळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विम्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून एक रुपयाही भरावा लागत नाही. एलपीजी सिलिंडरमुळे अपघाताचा धोका असतो. अनेकदा लोकांच्या घरात सिलिंडर फुटल्याच्या बातम्या आपण पाहतो. हे विमा संरक्षण सरकारकडून अशा घटनांमधून सावरण्यासाठीच दिले जाते.

सरकारी तेल कंपन्यांकडे करा क्लेम
अशा अपघातांनंतर नुकसान भरपाई ग्राहकाला दिलीजाते. कोणताही ग्राहक आपल्या कुटुंबासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून 50 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम करू शकतो.

विम्याच्या अटी काय?
>> अशा घटनांमध्ये सरकार प्रति सदस्य 10 लाख रुपये देते.
>> याशिवाय संपूर्ण कुटुंबासाठी कमाल 50 लाख रुपयांची मर्यादा आहे.
>> केवळ मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर या स्थितीत 2 लाख रुपयांचा क्लेम उपलब्ध आहे.
>> एखाद्याचा मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात संरक्षण म्हणून ६ लाख रुपये उपलब्ध आहेत.
>> उपचारासाठी प्रति सदस्य 2 लाख रुपये उपलब्ध असून कमाल 30 लाख रुपये दिले जातात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...