spot_img
अहमदनगरडॉक्टरांना लावला ४७ लाखांना चुना! फसवणुकीचा नवा फंडा मार्केटमध्ये दाखल? वाचा सविस्तर..

डॉक्टरांना लावला ४७ लाखांना चुना! फसवणुकीचा नवा फंडा मार्केटमध्ये दाखल? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेवगाव येथील शेअर मार्केटमधील फसवणुकीची घटना ताजी असतानाच आयपीओमध्ये लॉटरी लागल्याचे सांगून एका डॉक्टरला ४७ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून ते जुलै २०२४ यादरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. विजय नामदेव गाडे यांचे नेवासा येथे गाडे नेत्रालय आहे, त्यांनी सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंग कसे करावे, नफा कसा मिळावा, याबाबतची जाहिरात पाहिली. त्यावर डॉक्टरांनी क्लिक केले असता त्यांना एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता ते ‘आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए ५’ या ग्रुपला जॉईन झाले.

या ग्रुपची अॅडमीन अनिका शर्मा हिने डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला. आम्ही सांगतो, त्या पध्दतीने तुम्ही गुंतवणूक करा. तुम्हाला अधिक परतावा मिळेल, असे तिने सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी. त्यांच्या बँक खात्यातून १९ जून ते ९ जुलै २०२४ या दरम्यान ३९ लाख ३ हजार रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन ट्रान्सफर केले.

मात्र, त्यांना परतावा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी अनिका शर्मा हिच्याकडे परतावा मिळण्याबाबत विचारणा केली.तेंव्हा तिने तुम्हाला आयपीओमध्ये लॉटरी लागली आहे. तुम्ही जर आणखी गुंतवणूक केली तर तुम्हाला १५० ते १६० टक्के परतावा मिळेल, असे डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे ११ जुलै रोजी डॉक्टरांनी पुन्हा ८ लाख रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर डॉक्टरांनी परताव्याबाबत विचारणा केली असता शर्मा हिने आणखी ४ लाख रुपये भरण्यास सांगितले.हे पैसे भरले नाही, तर तुमचे खाते फ्रीज होईल, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी पैसे भरले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने डॉ. गाडे यांनी सायबर पोलिस ठाण्यात येऊन फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दिली.

गुंतवणूक कशी करावी, याबाबत जाहिरात केली जाते. गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करून गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. गुंतवणूक केल्यानंतर परतावा मागितल्यास आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. नंतर फोन बंद करून फसवणूक केली जात असून, फसवणुकीचा हा नवा फंडा असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अशाच पध्दतीने अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...