spot_img
अहमदनगरAhmednagar: २२५ कोटींची जागा लाटण्याचा डाव? दलालांची ३ खोक्यात मांडवली! जिल्हाध्यक्ष काळे...

Ahmednagar: २२५ कोटींची जागा लाटण्याचा डाव? दलालांची ३ खोक्यात मांडवली! जिल्हाध्यक्ष काळे यांचा ‘मोठा’ दावा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

शहरातील लँड माफिया टोळीने नामांकित हिंद सेवा मंडळ, पेमराज सारडा महाविद्यालयाचा सुमारे २२५ कोटींचा मोयाच्या ठिकाणी असणारा भूखंड हडपण्याचे षडयंत्र रचले आहे. या प्रकरणात टोळीशी संगनमत केलेले काही दलाल प्रत्येकी तीन खोयांच्या प्रलोभनास बळी पडून मांडवली करत आहेत. कुंपणच शेत खात असून १० ते १५ कोटींच्या कवडीमोल भावात जागा हडपण्याचा डाव शिजला आहे. माजी आ. अरुण बलभीम जगताप, बिल्डर हर्षल संतोष भंडारी यांनी जागेचा ताबा देण्याची लेखी मागणी केली आहे. किती रकमेला जागा घेणार याचा कोणताही उल्लेख जाणिवपूर्वक केलेला नाही. मंडळाच्या सहा प्रामाणिक विश्वस्तांनी यास कडाडून लेखी विरोध केला असल्याचा दावा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.  

पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र माध्यमांसमोर उघड केले. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, विकास भिंगारदिवे, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते. काळे नगरकरांच्या वतीने सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या प्रकरणाबाबत लेखी तक्रार करणार आहेत. नगर मनमाड रोडवर राष्ट्रीय महामार्गालगत स.नं.१६१/१ ची सुमारे ३ एकर २९ गुंठे एवढी पेमराज सारडा महाविद्यालयाची जागा व हिंद सेवा मंडळ गिळंकृत होऊ नये, यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका, लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. नगरकर जनतेच्या दरबारातही दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी मंडळ, सारडा महाविद्यालयाची जागा वाचविण्यासाठी जनआंदोलन उभे करण्यासाठीची आगामी दिशा स्पष्ट करणार असल्याचे काळे म्हणाले.

भारतातील एकेकाळी अग्रणी असणारी गुणे आयुर्वेद महाविद्यालय संस्थेनंतर आता काहींचा हिंद सेवा मंडळ हडपण्याचा डाव आहे. नगरकर हे कदापि होऊ देणार नाहीत. हा राजकारणाचा विषय नसून संवेदनशील विषय आहे. हिंद सेवा मंडळाची कदापी आयुर्वेद संस्था होऊ देणार नाही. काही दलालांचे उखळ या गैरव्यवहारात मजबूत पांढरे झाले आहे. परंतु पुढील शेकडो पिढ्यांचे स्वप्न त्यामुळे उद्ध्वस्त केले जात आहे. गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या हेतूने मंडळाच्या तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली.

संस्थेचे तत्कालीन सचिव नानासाहेब निसळ, डॉ. नारायण करमरकर, डॉ. श्रीनिवास कुलकर्णी या स्वातंत्र्य सैनिकांनी सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्टशी संपर्क साधून नाममात्र दराने ही जागा १९६४ साली ९९ वर्षांच्या भाडेकराराने घेतली. १९९५ च्या सुमारास तकीया ट्रस्टने ही जागा लूनिया, मुनोत यांना विकली. नव्या मालकांनी जागा खाली करून द्यावी म्हणून सिव्हील कोर्टात दावा दाखल केला. परंतु २००६ ला न्यायालयाने हिंद सेवाचा कब्जा वैद्य ठरवला. त्यामुळे भडेकराराची ४० वर्षे बाकी आहेत. निकाल लागल्यापासून या मोयाच्या जागेवर ताबेमारीचे प्रयत्न सुरू असल्याचे काळे म्हणाले.

२१ जून २०२३ ला अज्ञात लोकांच्या त्रासाबद्दल वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस मंडळाने दिली होती. २५ एप्रिल २०२३ ला मनपा आयुक्तांना अन्य कोणाचाही लेआउट प्लॅन मंजूर करण्यास हरकत घेणारे पत्र दिले होते. पोलिसांत गुंडांपासून होणार्‍या त्रासाबाबत तक्रार केली होती. मात्र जुलैपासून काही लाभार्थ्यांनी भूखंड माफियांशी हातमिळवणी करत अचानक दलालीची भाषा सुरू केली. काहींची भूमिका खोयांसाठी बदलली तर काही दहशतीला बळी पडले. सहाच महिन्यात नेमके असे काय घडले की, जागेचा ताबा टिकवण्यासाठीची, संरक्षण करण्यासाठीची भूमिका बदलून ताबा सोडण्याला अनेकांची संमती मिळू लागली, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.

यात तीन खोक्यांची दलाली मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. २१ जानेवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेत कोणी विरोध करू नये म्हणून दहशत करण्याचे नियोजन आहे. कार्यकारिणीच्या ३ जानेवारीला झालेल्या बैठकीपूर्वीच संस्थेच्या जागांचा ताबा सोडत मंडळाच्या सार्वजनिक मालमत्तेवर घातल्या जाणार्‍या दरोड्याला लेखी पत्र देऊन काहींनी विरोध केला. यामध्ये काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, मधुसूदन सारडा, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक प्रा. मकरंद खेर, भाजप नेते अनंत देसाई, विष्णूशेठ सारडा, शामसुंदर सारडा या सहा विश्वस्तांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधाची पत्र काळे यांनी उघड केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...