spot_img
अहमदनगरअहिल्यानगर मधील जेएसएस स्कूलला १ लाखाचा दंड; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर..

अहिल्यानगर मधील जेएसएस स्कूलला १ लाखाचा दंड; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी, अंबिका नगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरवले जात असल्याची तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीची महापालिका शिक्षण विभागाने दखल घेऊन तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना काढले होते. तर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला होता. मात्र सदर शाळेतील विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग बंद केले नसल्याने महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी यांनी संस्थेमार्फत शासनाची मान्यता नसताना, अनाधिकृतपणे माध्यमिकचे वर्ग भरविल्याने बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 (5) अन्वये 1 लाख दंडाचे आदेश काढले आहे.कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतलेले नाही, शाळेत तक्रारपेटी उपलब्ध नाही, शाळेत सखीसावित्री समिती फलक नाही, शैक्षणिक पात्रता धारक शिक्षक वर्ग नाहीत, शाळेत मुलांसाठी खेळाचे मैदान नाही, मुलांसाठी आवश्यक भौतिक सुविधा नसल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केलेली आहे.

जेएसएस गुरुकुल स्कूलने पालकांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने माध्यमिकचे वर्ग सुरु केलेले आहे. मात्र संस्थेच्या गैरकारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळणारा हा गंभीर प्रकार असून, संस्था चालकांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे असेल्याचे तक्रारदार मेहेर कांबळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...