spot_img
अहमदनगरडॉ.श्रीकांत पठारे यांनी घेतल्या महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी; उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी...

डॉ.श्रीकांत पठारे यांनी घेतल्या महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी; उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी…

spot_img

डॉ.श्रीकांत पठारे यांनी घेतल्या महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी; उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी…

पारनेर :- पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तापण्यास सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी गेल्या दोन दिवसांत महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असून त्यांच्या कार्याचा अहवाल डॉ.श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना सादर केला आहे व महाविकासआघाडी कडून त्यांनी उमेदवारी साठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

डॉ.श्रीकांत पठारे हे दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईला गेले होते दसरा मेळावा झाल्या नंतर महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद चंद्रजी पवार, ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रमुख नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या कार्याचा अहवाल डॉ.श्रीकांत पठारे यांनी या सर्व नेत्यांना दिला आहे. तसेच उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रबळ दावेदारी महाविकास आघाडी कडून दाखवली आहे.

डॉ.श्रीकांत पठारे यांच्या या भेटीगाठी बाबत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे सांगितले की, आम्ही महाविकास आघाडीतील जबाबदार पक्ष असून महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणे यात काही गैर नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी महाविकास आघाडी कडून उमेदवारीसाठी दावेदारी दाखवली असून यामध्ये महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मी माझ्या कार्याचा अहवाल त्यांना सादर केलेला आहे व महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच ही जागा मिळावी असा आग्रह केला आहे, तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षाने जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार निलेश लंके यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असल्याने आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला पारनेरची जागा शिवसेना पक्ष लढण्यास आग्रही असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत पारनेर नगर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा महाविकास आघाडीच्या वतीने फडकवणार असल्याचे डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...