spot_img
अहमदनगरअहमदनगर: युवकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; कुठे घडला प्रकार?

अहमदनगर: युवकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; कुठे घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सहा जणांच्या टोळक्याने युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना वैदूवाडीत घडली. संकेत दत्ता शिंदे (वय २०, रा. वैदूवाडी, ठुबे हॉस्पिटल रस्ता, पुजा किराणा स्टोअर्सच्या शेजारी) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून आदित्य काळू शिंदे, आशिष काळू शिंदे, रूपेश उर्फ बाबाजी बाबू शिंदे, काळू मारूती शिंदे, मिना काळू शिंदे, अंबादास मच्छिंद्र लोखंडे (सर्व रा. वैदूवाडी) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: सोमवारी (२४ जून) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान संकेत त्यांच्या घराबाहेर फोनवर बोलत असता तेथे आदित्य शिंदे हा आला व त्याने काही एक न विचारता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेवढ्यात तेथे आशिष शिंदे, रूपेश शिंदे, काळू शिंदे, मिना शिंदे व अंबादास लोखंडे हे सर्व आले. त्यांनी शेजारील टपरीतून लाकडी दांडके आणून संकेत यांना मारहाण केली. दगड फेकून मारून जखमी केले.

एका बोळीमध्ये ओढत नेले व तेथे पुन्हा मारहाण केली. संकेत यांना मारहाण होत असल्याचे पाहून एक जण सोडविण्यासाठी आला. तेव्हा मारहाण करणारे संकेत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी संकेत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून बुधवारी (२६ जून) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...