spot_img
आर्थिकपशुपालकांनो वेळीच करा 'हे' काम! अन्यथा कारवाईला जावे लागले समोर? पशुसंवर्धन विभागाची...

पशुपालकांनो वेळीच करा ‘हे’ काम! अन्यथा कारवाईला जावे लागले समोर? पशुसंवर्धन विभागाची मोठी माहिती, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय कोणत्याही जनावराची खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच टॅगिग नसेल तर शासनाच्या पशु वैद्यकीय संस्था, दवाखान्या मधुन दिली जाणारी वैद्यकीय सेवा बंद केली जाणार आहे.अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.एस व्हीं नांदे व पारनेर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.अरविंद रेपाळे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. पशुधनाची माहिती एकत्ररित्या उपलब्ध व्हावी त्यांचे आजार ,लसीकरण, यासह इतर माहिती मिळावी यासाठी भारत पशुधन प्रणाली सुरू करण्यात आली आहे .या प्रणालीवर पशुधनाची नोंद करण्यासाठी सर्व पशुंना ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे .त्या मधील बारा अंकी कोड मुळे संबंधित पशुधनाच्या माहितीची नोंद होणार आहे. पशुधनाचे मालक खरेदी ,विक्री, आजार लसीकरण, प्रजनन आदी विविध माहितीही मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे .कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. जनावरांच्या विक्री व वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. त्यामुळे पशुपालकांनी यांची काळजी घ्यावी भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. अशी माहिती पारनेर पशुधन विकास अधिकारी डॉ.रेपाळे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात पशुधन योजनांचा लाभ मिळणार नाही. सर्व पशुंना ईअर टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंग शिवाय वाहतूक करण्यास बंदी राहणार आहे. जनावरांना टॅगिंग नसल्यास संबंधित वाहतूकदार जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे तसेच टॅगिंग असल्याशिवाय खरेदी विक्रीलाही बंदी करण्यात येणार आहे. विनापरवाना कोणी वाहतूक करत असेल तर अशावेळी आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पारनेर तालुक्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनाची बिल्ले मारून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
– डॉ. अरविंद रेपाळे
पशुधन विकास अधिकारी, पारनेर.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...