spot_img
अहमदनगरतरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; कारण आलं समोर..

तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; कारण आलं समोर..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना केडगाव शिवारातील पुणे बायपास चौक येथील अण्णाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी (23 मे) घडली. प्रशांत बाळासाहेब गारकर (वय 30, रा. मोतीनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पवार, कृष्णा पवार (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. केडगाव), अमोल पाडळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नीलक्रांती चौक, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पुणे बायपास चौक परिसरातून जात असताना संशयित आरोपी संतोष पवार याने त्यांना थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

फिर्यादीने नकार दिल्याने संतोष पवारने रागाने इतर तीन संशयित आरोपींना बोलावले. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्‌‍यात संतोष पवारने फिर्यादीला खाली पाडले. अमोल पाडळे याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या बोटावर वार केला, कृष्णा पवारने दगडाने पाठीवर मारले आणि चौथ्या अनोळखी इसमाने लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अमिना शेख करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आतापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या...

सेना-भाजपमध्ये पहिली ठणगी पडली; निवडणुकीपूर्वीच काय घडलं पहा…

मुंबई / नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाले आहे....

‘मेंथा’चं रौद्र रूप, चक्रीवादळामुळे रेड अलर्ट, महाराष्ट्र सतर्क, IMD ने काय दिला अलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री : आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला धडकणाऱ्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर...