spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये मुसळधार; 'या' नदीला पूर..

अहिल्यानगरमध्ये मुसळधार; ‘या’ नदीला पूर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तर शनिवार, रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यापूवच जिल्ह्यात 201 मिलीमिटर पाऊस झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात 30 मिलीमिटर पाऊस झाला.

जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा सलग तीन दिवस सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात शनिवारी व रविवारी दक्षिण नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर व तालुका, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व राहुरी या तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला होता. भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण झाली. मान्सून पूर्व पावसाने सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. मंगळवारीही दुपारपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. शहरात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते.

सोमवारचा तालुकानिहाय पाऊस
सोमवारी जिल्ह्यात 30 मिलीमिटर पाऊस झाला. नगर 36.9, पारनेर 41.2, श्रीगोंदा 42.9, कर्जत 47.8, जामखेड 47.7, शेवगाव 12.9, पाथड 13.3, नेवासा 27.1, राहुरी 38.8, संगमनेर 19.1, अकोले 16.9, कोपरगाव 5.7, श्रीरामपूर 25.1, राहाता 34.7 मिलीमिटर पाऊस झाला. सोमवारी नागपूर 68, पारनेर 72, कर्जत 76.5, वालवड 76.5, वांबोरी 68 या पाच महसूल मंडलात अतिवृष्टी झाली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...