spot_img
अहमदनगरAhmednagar: यु टर्नच! माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, 'बीआरएस' ला करणार रामराम?

Ahmednagar: यु टर्नच! माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, ‘बीआरएस’ ला करणार रामराम?

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री-
काही महिन्रांपूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेलेले श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. येत्या ३ व ४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळावा होत आहे. यावेळी श्री. मुरकुटे यांचा प्रवेश होण्याची शयता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित पार पडला. या मेळाव्यास रा मेळाव्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अ‍ॅड. संदीप वर्पे आदी पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.

या मेळाव्यापूर्वी श्री. फाळके व अ‍ॅड. वर्पे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या ‘जिद्द’ निवासस्थानी जावून तर आ. प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनीवरून मुरकुटे यांच्याशी चर्चा करुन ज्येष्ठनेते शरद पवार यांचा पक्षासोबत आपण काम करावे, असा निरोप असल्याचे सांगितले.

यावेळी मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय कळवितो असे सांगितले. मात्र या चर्चेनंतर काही वेळात झालेल्या मेळाव्यास माजी आ. मुरकुटे यांची कट्टर समर्थक भाऊसाहेब मुळे, गणेश भाकरे, गणेश छल्लारे, प्रसाद खरात, आशिष दौंड, बाळासाहेब नाईक आदी उपस्थित होते. मुरकुटे समर्थकांचा उपस्थितीने अनेकांचा भुवरा उंचावल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी: 20 दिवसांनी निवडणुका होणार?; महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Election:दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती...

विळद घाटात मोठी कारवाई; काळा कारभार करणारे तिघे गजाआड..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने...

जुनी इच्छा पूर्ण होणार? कसा जाणार सर्वांचा दिवस?, वाचा आजचे भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...