पारनेर । नगर सहयाद्री-
सोमवारी सदा आनंदाचा येळकोट..भैराबोचे चांगभले ..येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत राज्यभरातून आलेल्या भाविकांनी श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ( ता.पारनेर ) येथील खंडोबाचे मनोभावे दर्शन घेत तळी भंडार कुलधर्म कुलाचार करीत आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेत चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा केला.या चंपाषष्ठी निमित्ताने श्री खंडोबा अभिषेक पूजा व आरती सौ शकुंतला व ज्ञानदेव लंके गुरुजी, सौ सुनीता व संतोष मुळे ( रा. मांजरवाडी ) यांच्या हस्ते करण्यात आली.
प.पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते खंडोबा मंदिर कळसाचा सुवर्ण कलशारोहणाने जिर्णोद्धार करण्यात आला होता या सुवर्ण कळसाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिर कळसाचा आठवा वर्धापन दिन गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिर सातवा वर्धापन दिन या निमित्ताने साजरा करण्यात आला.
पहाटे चार वाजता श्री खंडोबा मंगल स्नान चांदीची सिंहासन पेटी व चांदीच्या उत्सव मूर्तीचे चांदीच्या सिंहासनावर अनावरण करण्यात आले पहाटे पाच वा. उत्सव मूर्तींना साज शृंगरासह सजवण्यात येऊन पूजा व महाआरती करण्यात आली सकाळी सहा वाजता सकाळी दहा वाजता गोरेगाव येथून आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
दुपारी ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला दुपारी एक वा. खंडोबा चांदीची पालखी व चांदीच्या उत्सव मूर्ती यांची नवीन शाही रथातून मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक निघाली या पालखीवर भाविक भंडारा खोबऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करत होते. सकाळी ११ वा. भाविकांना महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर चांदीच्या पालखीचे व्यासपीठावर आगमन झाले यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली.
चंपाषष्ठी उत्सवा दरम्यान अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे,माजी जि.प.सदस्या राणीताई लंके तहसीलदार गायत्री सौंदाणे उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड माजी अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड ,सरचिटणीस जालिंदर खोसे ,चिटणीस कमलेश घुले,अशोक घुले,विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले उपस्थित होते.
पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पिण्याचे पाणी दर्शन व्यवस्था आधी सुविधा देवस्थान ट्रस्टने केल्या होत्या.