पारनेर/ नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत नगर मध्ये निर्माण झालेली चुरस आत्ता निर्णायक अवस्थेत आली आहे. निलेश लंके यांचे होमग्राऊंड समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यात जोरदार धमाका झाला आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर आणि बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी शेठ बेलकर या दोघांनी लंके यांची साथ सोडून विखे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बेलकर बंधू लंके यांची साथ सोडून विखे यांच्या गोटात आल्याने मोठा धमाका झाला आहे.
विकास कामांच्या मुद्द्यावर निर्णय घेताना तालुक्यातील दहशतीला कंटाळून हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान गंगाराम बेलकर आणि शिवाजी बेलकर या दोंघानाही मांननारा मोठा वर्ग तालुक्यात आणि पठार भागावर आहे. या दोघांनीही विखे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय धमाका झाला असून त्याचे नक्कीच पडसाद उमटणार आहेत.