अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरामध्ये एका बड्या व्यावसायिकाला कामगाराने १० लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून कामगाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील प्रकाश बिरादार वाणीनगर, (रा. रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे.
शहरातील एका व्यावसायिकाकडे सुशील दीड महिन्यांपासून कामाला होता. त्याच्याकडे बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे तो विश्वासाने बँकेत भरणा करत होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्याच्याकडे दहा लाख रुपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी दिली होती.
बँकेतून न आल्याने व्यावसायिकाने त्याला फोन लावला असता त्याचा फोन बंद लागला. बँकेत जाऊन बिरादार याने पैसे भरणा केले का? अशी विचारणा केली असता बँकेत पैसे भरले नसल्याची माहिती त्यांना समजली.
व्यावसायिकाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून कामगार सुशील प्रकाश बिरादार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.