spot_img
अहमदनगरAhmednagar: 'महिलांची टोळी मुद्देमालासह जेरबंद', 'असा' साधायची डाव

Ahmednagar: ‘महिलांची टोळी मुद्देमालासह जेरबंद’, ‘असा’ साधायची डाव

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्या महिलांकडून २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड (वय ३२, रा. काळकुप, ता. पारनेर) हे २२ मे २०२३ रोजी तारकपूर बस स्टँड येथून आळेफाटा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्टँडवर चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ. सुनील चव्हाण, संदीप पवार, अतुल लोटके, पोना. रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोकॉ. भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, मपोकॉ. सोनाली साठे यांचे पथक नेमले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ डिसेंबरला अहमदनगर शहरातील बस स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपींची माहिती घेतली जात होती. पोनि दिनेश आहेर यांना त्यावेळी तीन महिला तारकपुर बस स्टँड येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पथकास दिली.

पथकाने तारकपूर बस स्टँड येथे सापळा रचून तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये छाया किसन भोसले (वय ५०, रा. माळीवाडा), जमुना संदीप काळे (वय २६, रा. वाकी, ता. आष्टी), शितल आदिनाथ भोसले (वय २२, रा. हातवळण, ता. आष्टी) यांचा समावेश आहे. त्या महिलांची माहिला पोलीस अंमलदारमार्फत झडती घेताली असता त्यांच्या जवळील पिशव्यांत सोने व रोख रक्कम २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिण्याबाबत विचारपूस केली असता जिल्ह्यातील नेवासा, जामखेड, पारनेर येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे जिल्ह्यात १० गुन्हे उघडकीस आले आहेत. या महिलांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...