अहमदनगर। नगर सहयाद्री
संगमनेर तालुयातील साकुर येथे देवराम मुक्ता खेमनर यांच्या डोयात दगड घालून खून झाला होता. यातील दोन आरोपींना पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले आहे.
घडलेल्या घटनेसंदर्भात मृताचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५), सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, दोघे रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक आहेर यांनी १९ जानेवारीस स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ अतुल लोटके, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल यांचे पथक तयार केले.
पथकाने घटनास्थळी जाऊन परिसरातील लोकांकडे चौकशी करून तांत्रिक विश्लेषणच्या आधारे तपास सुरु केला. या दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपी नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे डोंगरामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली.
पथकाने चिंचेवाडी परिसरातील डोंगरात जात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. दारु पिण्यासाठी देवराम खेमनर यांच्या खिशातील पैसे काढून त्यांच्या डोयात दगड टाकून खून केल्याचे आरोपींनी संगितले. यातील आरोपी नामदेव रंगनाथ सोन्नर हा इतर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.