spot_img
ब्रेकिंगpolitics News: सिंह कन्या राशीत झुकलेला होता!! अजित पवार यांच्या गटाचा निशाणा

politics News: सिंह कन्या राशीत झुकलेला होता!! अजित पवार यांच्या गटाचा निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
खा. सुप्रिया सुळे यांची पात्रता असती, तर आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते, अशा शब्दात अजित पवार गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उत्तर दिले आहे.

‘मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसर्‍यांदा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण, पात्रता असताना देखील स्वत:च्या मुलीला बाजुला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.

यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या पाठीशी ५४ पैकी ४३ आमदार आहेत.

सुप्रिया सुळे यांची पात्रता असती, तर ४३ आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. सिंह कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. सिंह कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेल्याने हा गृहदोष निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...