spot_img
अहमदनगरआ. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाने नगर तालुका पोरका झाला

आ. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाने नगर तालुका पोरका झाला

spot_img

खडकी येथे शोकसभेचे आयोजन । अनेकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भाजपा नेते, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मात निधनाने नगर तालुका पोरका झाला आहे. त्यांच्या निधनामुळे नगर तालुक्याच्या जनतेचे मोठे नुकसान झाले असून कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे. कर्डिले साहेबांनी कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम केले. दूधवाला आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगत अनेकांनी आमदार कर्डिले यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

भाजपचे ज्येष्ठ नेते, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मात निधन झाल्याने नगर तालुक्यातील कायकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, खंडाळा विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ग्रापंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने खडकी येथे गुरुवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ नेते गुलाब आप्पा कार्ले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे, किसनराव लोटके, चेअरमन श्रीकांत कार्ले, सरपंच भाऊसाहेब बहिरट, सरपंच भाऊसाहेब काळे, शरद कोठुळे, माजी उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, ज्येष्ठ पत्रकार लहुकुमार चोभे, जितेंद्र निकम, माजी सरपंच सुरेश काटे, प्रविण कोठुळे, सुनील कोठुळे, अशोक कोठुळे, सुनील कोठुळे सर, राहुल बहिरट, परसराम तडके, विजय साळवे, राघू चोभे, तुळशीराम काळे, सचिव रावसाहेब काळे, माजी चेअरमन रमेश खेंगट, चंद्रकांत कोठुळे मेजर, रावसाहेब कोठुळे, सचिन पवार, भरत कार्ले, प्रमोद चोभे, भाऊसाहेब कोठुळे, दिलीप शिंदे, बाबा झरेकर, राजेंद्र काळे, मेघराज कोठुळे, काशिनाथ चोभे, माजी मुख्याध्यापक दिपक वाबळे, माजी उपसरपंच भाऊसाहेब चोभे, सुभाष चोभे, सचिन कोठुळे, केतन निकम, दत्तात्रय खेंगट, दिलीप शिंदे, बाळासाहेब लोटके महाराज, अनिल कोठुळे, केतन निकम, निकेतन तडके, रावसाहेब काठुळे, संजय बहिरट, नाथासाहेब कोठुळे, रतन बहिरट, नवनाथ कोठुळे यांच्यासह खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आमदार कर्डिले यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.

अक्षयदादांच्या पाठिशी उभे राहणे हिच खरी श्रद्धांजली ठरेल
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या झालेल्या आकस्मात निधनाने नगर तालुका पोरका झाला आहे. फक्त कर्डिले कुटुंबियांच्याच डोक्यारील छत्र हरपल नाही तर संपूर्ण नगर तालुक्याच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. आमदार कर्डिले यांचा तालुक्यातील जनतेला मोठा आधार होता. त्यांच्या जाण्याने नगर तालुक्याची सर्वात मोठी हानी झाली आहे. कधीही भरुन न निघारी पोकळी निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत आमदार कर्डिले यांनी जसा आपल्याला आधार दिला. त्याचप्राणे आपण सर्व मिळून अक्षयदादा कर्डिले यांना आधार देणार आहोत. सर्व जण अक्षयदादांच्या पाठिशी उभे राहणे हीच खरी आमदार कर्डिले साहेबांना श्रद्धांजली ठरेल असे मत सरपंच भाऊसाहेब बहिरट, भाऊसाहेब काळे, शरद कोठुळे, श्रीकांत कार्ले, सुरेश काटे यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले.

सर्वसाान्यांना पाठबळ देणारा नेता
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार 365 सुरुच असायचा. याच जनता दराबारातून अनेकांची कामे तात्काळ मार्गी लागायची. काम घेऊन येणार्‍या व्यक्तीचे साहेबांकडे आल्यानंतर काम मार्गी लागायचेच. समोरच्या व्यक्तीचे काम करण्यासाठी त्यांना कोणाच्या शिफारशीची गरज लागत नव्हती. लाल मातीतून घडलेला नेता, दुधवाला आमदार, मंत्री असा त्यांचा जीवन प्रवास राहिला. सर्वसामान्यांना पाठबळ देणारा नेता अशीच त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली असे मत बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे, लहुकुमार चोभे, जितेंद्र निकम, राहुल बहिरट यांनी व्यक्त केले.

शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा नेता होणे नाही
नगर तालुक्यातील घोसपुरी, बुर्‍हाणनगर पाणी योजना आदार शिवाजीराव कर्डिले यांनी मंजूर करुन आणल्या. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. 30 ते 35 वर्ष लोकप्रतिनिधीत्व केले. नगर तालुक्याच्या विकासात भरीव योगदान आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिले. विरोधकांनाही त्यांनी समजून घेण्याची भूमिका घेतली असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, किसनराव लोटके यांनी यावेळी मांडले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...