spot_img
ब्रेकिंगहिवाळी अधिवेशन..आगामी निवडणुका.. ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या देऊन अजित पवारांचा...

हिवाळी अधिवेशन..आगामी निवडणुका.. ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या देऊन अजित पवारांचा विक्रम

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.

आगामी निवडणूक लक्षात घेऊन हे बहुतेक शेवटचे अधिवेशन होईल असे म्हटले जात असल्याने अजित पवारांनी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. जुलै महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सुमारे ४१ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या त्यांनी सादर केल्या होत्या. तो विक्रम यंदा अजित पवार यांनीच मोडीत काढत आज इतक्या मोठ्या प्रमाणात मागण्या मांडल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी कोटींची उड्डाणे घेऊन पुरवणी मागण्या सादर केल्याची चर्चा रंगलीय.

डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात एकूण रु. ५५,५२०.७७ कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात येत आहेत. यापैकी रु. १९,२४४.३४ कोटीच्या अनिवार्य, रु. ३२,७९२.८१ कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु. ३,४८३.६२ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत.

महत्त्वाच्या पुरवणी मागण्या
जल जीवन मिशन : ४२८३ कोटी
मनपा क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी : ३०० कोटी
पंतप्रधान पीक विमा योजना : २७६८ कोटी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन : २७३८ कोटी
रस्ते बांधकाम : २४५० कोटी
श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना : २३०० कोटी
आशियाई विकास बँकेकडून प्राप्त होणारे कर्ज : २२७६ कोटी

नमो शेतकरी सन्मान निधी : २१७५ कोटी
यंत्रमाग, कृषिपंप ग्राहकांना विजदरात सवलत : १९९७ कोटी
पंतप्रधान आवास घरकुल योजना : १००० कोटी
मुंबई मेट्रो- मुद्रांक शुल्काचे प्रदान : १००० कोटी

स्वयंसहायता गटांना फिरता निधी : ९९६ कोटी
पोलिस कार्यालयीन इमारतींचे बांधकाम : ६९८ कोटी
संजय गांधी निराधार योजना अनुदान : ६८७ कोटी
पाटबंधारे विकास महामंडळांना अंशदान : ६०० कोटी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...