spot_img
देशविराट कोहली खरंच 'या' वर्षी निवृत्ती घोषित करणार? चाहत्यांसाठी मोठी बातमी

विराट कोहली खरंच ‘या’ वर्षी निवृत्ती घोषित करणार? चाहत्यांसाठी मोठी बातमी

spot_img

नगर सह्याद्री टीम : विराट कोहली सध्या फॉर्म मध्ये आहे. धावांचा तो डोंगर उभा करत आहे. दरम्यान आता त्याच्याबाबत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल भविष्यवाणी केली गेली होती.

विशेष म्हणजे यात जे लिहिलं आहे ते आतापर्यंत खरं ठरलं असल्याचं दिसून येत आहे. यात आता त्याच्या निवृत्तीबाबत भाकीत केलं आहे.या पोस्टमध्ये असं म्हटलं होत की, विराट कोहली २०१६,२०१७ आणि २०१८ मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर जाईल. झालंही तसच.

यादरम्यान तो भारतीय संघाचा कर्णधार झाला. २०१७ च्या शेवटी किंवा २०१८ च्या सुरुवातीला विराट विवाह बंधनात अडकेल असं भाकीत केलं होत. हे देखील खरं ठरलं आहे. विराट डिसेंबर २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकला. त्यानंतर २०२१ ते २०२५ या कालावधीत विराट धावांचा पाऊस पाडेल,असं म्हटलं गेलं होतं आणि झालं ही असंच. सध्या विराट तुफान फॉर्ममध्ये आहे.

निवृत्तीबाबत भाकीत !
या भविष्यवाणीत त्याच्या निवृत्तीबाबत देखील घोषणा करण्यात आली आहे. २०२५ ते २०२७ हा विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट काळ असेल. २०२७ या कालावधीत तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करु शकतो असं यात म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...