सुपा | नगर सह्याद्री:-
औद्योगिक नगरीचे प्रवेशद्वार असलेले सुपा बस स्थानकाचे नुतनीकरण लवकरात लवकर व्हावे अशी प्रतिक्षा नागरिक विद्यार्थी यांना लागली आहे. यासाठी अडीच कोटी निधि मंजुर झाला असुन काम चालु होण्याची प्रतिक्षा लागली आहे.
अहमदनगर पुणे महामार्गावरील सर्वात विकसित व वर्दळीचे ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकातील बस स्थानकाचे नुतनीकरण होऊन त्या ठिकाणी आद्यावत सुसज्ज इमारतीसह अधुनिक बस थांबा व्हावा अशी अनेक दशका पासुनची मागणी आहे. मागील काही महिन्यात या बस स्थानकासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला असुन लोकसभा अचारसंहिते मुळे टेंडर सह पुढील प्रक्रिया थांबली होती. नुकतीच लोकसभेची निवडणूक संपली असुन पुढील दोन तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागु शकते तेव्हा त्या अगोदर टेंडर प्रक्रियेसह सर्व प्रोसेस होऊन कामाचा नारळ फुटावा अशी सुपा नागरीक विद्यार्थी व प्रवाशाची मागणी आहे.
सुपा बस स्थानकासाठी महामंडळाची ७८ गुंठे जागा असुन त्या ठिकाणी अद्यावत सर्व सोयी सुविधान युक्त सुसज्ज बस स्थानक उभारण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आचारसंहितेमुळे टेंडर प्रक्रिया थांबली होती परंतु लवकरच आचारसंहिता सिथील होऊन तांत्रिक बाबी पुर्ण होऊन लवकरात लवकर काम चालू व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. सुपा बस स्थानकावरुन शेकडो बस रोज धावत असतात तर औद्योगिक वसाहतीचे कामगार व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवासी येथुन ये जा करतात. सध्या अस्तित्वात असलेले बस स्थानक खुपच तोडके असुन खुप जुनी इमारत आहे.
थोड्या पावसात संपूर्ण इमारत गळते. तसेच याठिकाणी शौचालय पिण्याचे पाणी अशा भौतिक कोणत्याही सुविधा नाहीत. बस स्थानक मोडकळीस आलेले आसल्याने प्रवासी तेथे थांबत नाही. तसेच अनेक बस चालक ही बसेस स्थानकात न आणता महामार्गावरच उभ्या करतात व पुढील प्रवास करतात. यामुळे अनेक प्रवाशाची धावपळ होते. स्थानकात थांबायचे की महामार्गावर रोडला उभे राहायचे. अनेक प्रवासी तर इकडे तिकडे पळत असताना अपघात ग्रस्त झाले आहेत. बस स्थानक व्यवस्थित नसल्याने मुली महिलांची खुप परवड होते. तेव्हा लोकसभेची आचारसंहिता संपत आली असुन पुढील विधानसभेची आचार संहिता लागु होण्या आगोदर बसस्थानकाचे काम चालू व्हावे अशी विद्यार्थी प्रवाशांची मागणी आहे.