spot_img
अहमदनगरAhmednagar: पाणीपुरवठा विस्कळीत होणार? महावितरणाने दिला महापालिकेला 'असा' इशारा

Ahmednagar: पाणीपुरवठा विस्कळीत होणार? महावितरणाने दिला महापालिकेला ‘असा’ इशारा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेकडे थकीत असलेल्या पाणी योजना व पथदिव्यांच्या विजेच्या थकीत बिलापोटी महावितरण कंपनीने पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. १६ फेब्रुवारीला याबाबत मनपाला नोटीस बजावली असून, तत्काळ ५.९० कोटींची थकबाकी न भरल्यास २१ फेब्रुवारीला कारवाई करण्यात येईल, असे महावितरण अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वर्षभरात महावितरण कंपनीने चार वेळा पाणी योजनेची वीज तोडली आहे. आता पाचव्यांदा वीज तोडली जाण्याची शयता असून त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शयता आहे. मार्च अखेरीच्या पार्श्वभूमीवर महावितरण व जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे वीज बिल व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू आहे. दर आठवड्याला कारवाईच्या नोटीसा दिल्या जात आहेत.

आठ-दहा दिवसांपूर्वीच महावितरण कंपनीने वीज तोडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरण अधिकार्‍यांना कोंडल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला होता. आता पुन्हा महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. डिसेंबर महिन्याचे २.८२ कोटी, जानेवारी महिन्याचे २.८५ कोटी व नोव्हेंबर महिन्याच्या बिलातील १३.४९ लाख असे ५.९० कोटी रुपये तत्काळ जमा करावेत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...