spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीची ताकद वाढणार? अजित दादांना 'त्यांनी' पुन्हा पाठिंबा दिला!

राष्ट्रवादीची ताकद वाढणार? अजित दादांना ‘त्यांनी’ पुन्हा पाठिंबा दिला!

spot_img

Politics News: Politics News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा होत असून बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे.

दरम्यान, आता अजित पवार यांना दिलासा दिणारी बातमी समोर आली. विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची ताकद आणखी वाढली आहे. ऑल इंडिया जमात ए सलमानी समाजाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात बुधवारी ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी माहिती देण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सलमानी समाजासह बंजारा समाज, कामगार वर्ग, अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत असल्याने पक्ष अधिक सक्षम होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यापक होत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...