spot_img
अहमदनगरमविआतील वंचितच्या जागांचा तिढा सुटणार? फॉर्मूला नेमका कसा,पहा..

मविआतील वंचितच्या जागांचा तिढा सुटणार? फॉर्मूला नेमका कसा,पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन एक आठवडा संपला तरीही महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीही महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे बोलले जात होते, पण काल खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाहीफ, असं वक्तव्य केले.

त्यामुळे वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आता महाविकास आघाडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष दोन-दोन जागा सोडायला तयार असल्याचे बोलले जात आहे, वंचितनेही ६ जागांचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून वंचितसाठी दोन जागा सोडल्या जाऊ शकतात. वंचितसाठी काँग्रेस सकारात्मक असून काँग्रेसला येणार्‍या दोन जागा सोडण्यासही काँग्रेसचे नेते तयार आहे. यामुळे आता वंचित महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची शयता आहे.

वंचितला दोन जागा सोडण्याबाबत अजूनही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना ठाकरे गटाकून कोणत्याही सकारात्मक हालचाली सुरू नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही आहे. वंचितने महाविकास आघाडीला शेवटचा प्रस्ताव दिला असून उद्या (दि.२७) प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...