spot_img
अहमदनगरराष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? मोठी माहिती आली समोर..

राष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? मोठी माहिती आली समोर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
विधानसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना व आमदारांना सूचना केल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभेच्या रींगणात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही लवकरच महाराष्ट्र दौरा करत आहेत. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेयांनी जिल्हा दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर याचाही अंदाज पक्षाचे नेते घेत आहेत.

अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील 12 जागांवर चाचपणी सुरू असल्याचे संकेत देखील दिले. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? असा सवाल उपस्थित होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...