spot_img
राजकारणआ. नीलेश लंके शरद पवार गटात जाणार? खुद्द शरद पवारांनी चर्चा फेटाळल्या,...

आ. नीलेश लंके शरद पवार गटात जाणार? खुद्द शरद पवारांनी चर्चा फेटाळल्या, म्हणाले तथ्य नाही..

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. असे अनेक लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा आहे.

मात्र, लंके यांच्याबाबतीत यात काहीही तथ्य नाही, असे म्हणत पवार यांनी सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चर्चा फेटाळून लावली. आज सकाळपासून जोरदार सुरू असलेली ही चर्चा शरद पवार यांनी एका वाक्यात फेटाळून लावली. ही चर्चा मला तुमच्याकडूनच कळते आहे, असेही पवार म्हणाले.

नीलेश लंके परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेंना परतीची साद घातली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे गणित लक्षात घेऊन आमदार नीलेश लंके आज घरवापसी करणार असल्याचं बोललं जात होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून लंके पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर परतीच्या मार्गाने आलेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते.

सध्या आ. निलेश लंके हे खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत, पक्ष फुटीच्यावेळी लंके अजितदादांसोबत गेले. तर नगरचा जागा भाजपच्या वाट्याला आहे. येथे बदल होण्याची शक्यता धूसर असल्याने लंके पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

आज सकाळी ही चर्चा अचानक वेगाने सुरू झाली. पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद बोलाविली होती. त्यावेळी लंके यांचा पक्षप्रवेश आणि घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत होत होते. शिवाय लंके रात्रीच पारनेरमधून बाहेर गेलेले आहेत. पारनेरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही यांची माहिती नव्हती. तरीही सूत्रांच्या हवाल्याने लंकेच्या घरवापीसीच्या बातम्या पसरत होत्या.

यासंबंधी पत्रकारांनी पत्रकार परिषदेतच खुद्द पवार यांना यासंबंधी विचारले. त्यावर पवार म्हणाले की या चर्चेत काहीही तथ्य नाही. लंके संपर्कात आहेत, ते आले तर त्यांना पुन्हा प्रवेश देणार का? या प्रश्नांनाही पवार यांनी थेट उत्तरे दिली नाहीत. जे सोडून गेले आहेत, त्यांनाही हे काही बरे चालले नाही, हे कळत आहे. त्यामुळे अनेकांची अशा अनेकांच्या चर्चा आहेत, अनेक इच्छूक आहेत. यासंबंधी माहिती तपासून, योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले. त्यामुळे लंके यांच्या घरवापसीच्या चर्चेवर तूर्त तरी पडदा पडला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...