spot_img
अहमदनगरकोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच : नागवडे

कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच : नागवडे

spot_img

श्रीगोंदा / नगर सह्याद्री  : बाप्पू हयात असताना त्यांनी सर्व नेत्यांना मदत केली. परंतु आम्हाला कोणी मदत करत नाही. काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढवणारच असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नागवडे यावेळी म्हणाले, महाविद्यालयामध्ये बापूंनी कशाप्रकारे उभारणी केली हे आपण पहात आहात, उद्याच्या काळामध्ये या संस्थेचे नाव कसे मोठे होईल यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत असेही ते म्हणाले. आम्ही सहकारी कारखाना चालवत असून शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कधीच पैसे थकवले नाहीत.

सहकार टिकला तर शेतकरी टिकेल असेल ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार भवनासाठी जागा मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तालुक्यासाठी पत्रकार भवनासाठी जागेचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. मात्र आतापर्यंत माझ्याकडे कोणी मागणी केली नव्हती. पण पत्रकार भवनासाठी जागा मिळवून देणारच असे नागवडे म्हणाले.

स्वर्गीय बापूंच्या जयंतीनिमित्त १९ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची  माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रशांत दरेकर, सुरेश रसाळ, भाऊसाहेब नेटके, श्रीनिवास घाडगे, दत्तात्रय काकडे, शरद खोमणे, संदीप औटी, सुभाष शिंदे, बंडूतात्या जगताप, वसंतराव वाळुंज,  पत्रकार बांधव उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...