spot_img
ब्रेकिंग'जंगल परिसरातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती'

‘जंगल परिसरातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती’

spot_img

श्रीगोंदा| नगर सहयाद्री 
खळखळणारे नदी नाले, पाण्याने तुडूंब भरलेले डोह, किलबिल करणारे पक्षी, अशा वृक्षवल्ली मध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असे दृश्य आज श्रीगोंदा तालुक्यातील जंगल परिसरामध्ये पाहिला मिळत नाही. कारण निसर्गातील जीवन म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा पाणी नावाचा घटक असल्याने जंगलात पाण्यासाठी जणू काही लॉकडाऊन सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे.

उन्हाळ्यात वन विभागाकडून वन्य प्राण्याचे पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केलेले चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढला असून वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता वन विभागाने पानवट्यात पाणी सोडावे अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील जंगलात वन्यप्राण्यासाठी ठीक ठिकाणी पानवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र कायमस्वरूपी हे पानवठे कोरडे राहत असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. देऊळगाव गलांडे येथील जंगलात हरीण, ससे, कोल्हे, लांडगे,मोर यासह पशुपक्षी यांचे मोठे वास्तव्य आहे. वनविभागाच्या वतीने वीस बावीस वर्षांपूर्वी तालुक्यातील सर्व जंगलामध्ये ठिकठिकाणी पानवठे बांधण्यात आले होते.

मात्र त्या पानवट्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशीच झाली आहे. याकडे वन विभागाने गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्याने हे पानवठे तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. दरवर्षी सामाजिक संस्था वन्यप्रेमींकडून या पानवट्यात पाणी सोडले जात होते. मात्र हे पानवठेच निकामी झाल्याने भर उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी लाही लाही होताना दिसत आहे परिणामी हे प्राणी लोक वस्तीकडे पिण्याच्या पाण्यासाठी शोधात धाव घेत आहेत. वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन पानवट्याची दुरुस्ती करून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तालुक्यातील सर्व वन्यप्रेमी व तसेच घुगल वडगाव चे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

वन विभागाने पानवट्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी
साधारण डिसेंबर ते जानेवारी पर्यंत विहीर किंवा बोरवेलला पाणी टिकते. या दरम्यान शेतात पिकाला पाणी देण्याचे काम चालू असते. त्यामुळे वन्य प्राणी आपली तहान भागवतात. मात्र फेब्रुवारी नंतर बोरवेल व विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते किमान वन विभागाच्या वतीने तीन ते चार महिने पानवट्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी
– सामाजिक कार्यकर्ते महेश पवार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...