spot_img
अहमदनगर'जिल्ह्यातील 'या' रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर' खासदार सुजय विखे पाटील यांची...

‘जिल्ह्यातील ‘या’ रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर’ खासदार सुजय विखे पाटील यांची माहिती

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (एनएच ५६१) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी ६५१.१५ कोटी रुपये, बेल्हा ते शिरूर ३८ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ३८६.१६ कोटी आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी- श्रीगोंदा- आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी १०.५५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुजय विखेंनी सांगितले.

सदर कामांसाठी नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे मागणी केली होती. दरम्यान या मागणीवर योग्य तो पाठपुरावा केला आणि आज सदरील भरीव निधी हा या रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे. एक लोकप्रतिनिधी या नत्याने जेव्हा जेव्हा शासनाकडे पाठपुरावा करतो, तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतो या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो.

कारण प्रामाणिकपणे विकास कामे मार्गी लावणार्‍या लोकप्रतिनिधीला कुठल्याही निधीची कमतरता भासत नाही. त्याची विकासकामे ही सर्वांना दिसत असतात. निश्चितच केंद्र शासनाच्या वतीने यापुढे देखील असा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यास मी सदैव कटिबध्द राहील असे मत देखील यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.

तसेच यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. तसेच नागरिकांना भेडसावणार्‍या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी याप्रमाणेच तत्पर भूमिका घेत राहील असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कसुरी? वाचा, माहिती..

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन...

स्कुटीवर चाललेल्या दोन महिलावर अ‍ॅसीड फेकले; अहिल्यानगर जिल्ह्यात भयंकर प्रकार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस सर्वोत्कृष्ट

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल –...

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...