spot_img
महाराष्ट्रअजितदादा भाजप सोबत का आले?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण...

अजितदादा भाजप सोबत का आले?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री नगर-
शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला.

देवेद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे.”

मुंबईच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईचा विचार केला तर उद्धव ठाकरेंना लक्षात आलं आहे की, मराठी मतं ही पूर्वीसारखी त्यांच्याकडे राहिली नाहीत. आम्ही वेगळं लढलो तर भाजपच्या जागा जास्त आल्याचं दिसलं. त्यामध्ये मराठी मतदार हे भाजपच्या मागे असून मोदीजींच्या नावाखाली ते भाजपला मतदान करतात. ते भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांसाठी पायघड्या घातल्या. त्यामुळे काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिमधार्जिनी भूमिकी ठाकरेंनी घेतली.”

आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असून या सरकारचं नेतृत्व हे मुख्यमत्री हेच आहेत. आपण आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून अधिकार घेतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील अनेक नेत्यांमध्ये असलेले मतभेद हे सागर बंगल्यावर सोडवली गेली, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात माझा सर्वच पक्षातील नेत्यांशी संपर्क आहे. आपण कुणालाही फसवणार नाही असा त्यांना विश्वास आहे. त्याचमुळे माझ्या कुवतीप्रमाणे सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमधून मार्ग काढतो.

अजितदादांना ज्यावेळी लक्षात आलं की शरद पवारांच्या सोबत राहिल्याने अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही, त्याचवेळी अजित पवारांनी ही भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाने अनेक राज्याच्या निवडणुकीत एक सूत्र पाळलं, त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना विश्वासात घेऊन संसदीय समिती यावर निर्णय घेईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...