spot_img
अहमदनगरकुछ तो गड़बड़ है! घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत? बँक बचाव...

कुछ तो गड़बड़ है! घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत? बँक बचाव संघर्ष समितीचा सवाल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळा महाराष्ट्रभर गाजला. त्यानंतर बँकेचा गलथान कारभारा संदर्भात बँक बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सातत्याने बँकेच्या कारभाराविरूद्ध समिती संघर्ष करत आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी बँकेची सर्व कर्जे वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. धनदांडग्या थकबाकीदार कर्जदारांना सहकार्य करण्याचे आवाहन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान कोट्यावधींचा घोटाळा केलेले आरोपी पोलिस प्रशासनाला का सापडत नाहीत असा संतप्त सवालही डी.एम. कुलकर्णी यांनी केला.

मंगळवार दि.१ ऑटोबर रोजी बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. बँक बंद पडून जवळपास एक वर्ष होत आले आहे. प्रकरणाची कोणतीच गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे जलद प्रक्रिया पार पाडण्यासाठी बँक बचाव संघर्ष समिती प्रयत्न करत आहे. बँकेने ठेवीदारांना ९०० कोटीच्या ठेवी परत केलेल्या आहेत. आणखी ठेवी लवकरच ठेवीदारांना परत करणार असुन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे

करून नव्याने भाग भांडवल व ठेवी मिळून नगर अर्बन हा शब्द कायम ठेऊन सुरूवातीला एक भक्कम अर्थिक संस्था उभी करून त्या माध्यमातून बँकेच्या नावाबरोबरच बँकेची इमारत मोठ्या डौलाने, अभिमानाने सुस्थापित राहिल अशी समितीची धारणा व ध्येय आहे. त्यासाठी धनदांडग्या थकबाकीदार कर्जदारांनी त्यांच्या कर्जाची परतफेड जलद करावी. बँकेने एकरकमी कर्जफेड योजना चालू केली असून त्याचाही फायदा कर्जदारांनी घ्यावा. कर्जाची परतफेड करून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्बन बँकेच्या मालकीचे गाळे ताब्यात घ्या
चितळे रोड वरील लोढा हाईट इमारतीमधील नगर अर्बन बँकेच्या मालकीच्या गाळ्यांवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने ताबेमारी केली आहे. ते गाळे बँकेने ताब्यात घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी अर्बन बँकेचे मॅनेजर कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चितळे रोडवरील लोढा हाईट या इमारतीमधील गाळ्यावरती नगर अर्बन बँकेचा ताबा असून गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा पदाधिकार्‍याने गाळ्यांवर ताबा मारला आहे. ते गाळे भाड्याने देऊन वसुली करत आहे. हे ताबेमारीचे जनक असून निवडणुकीमध्ये देखील पराभवाचा विक्रम केलेला आहे. नगर अर्बन बँकेला एक उज्वल परंपरा होती मात्र अशा लोकांमुळे बँक अडचणीत आली आहे. बँकेचे कर्मचारी यांना पगार मिळत नाही त्यांच्या कुटुंबावर एक आर्थिक संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे ठेवीदार अडचणीत सापडला आहे. बँकेला पूर्वपदावर येण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. बँकेवरील प्रशासकाने तातडीने चितळे रोड नेता सुभाष चौकातील लोढा हाईट या बिल्डिंग मधील अर्बन बँकेच्या ताब्यातील गाळे तातडीने ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया राबवावी अन्यथा बँकेसमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी बँकेचे मॅनेजर कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, बबली गायकवाड, विशाल शिंदे, फैसल बॉसर, अमोल शेडाळे, निलेश घुले, बाळू राऊत, सैफअली शेख, अभिजीत खरपुडे, चेतन लखपती, सुहास पाटोळे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...