निघोज । नगर सहयाद्री:-
गेली चार दिवसांत शिरुर, जवळा, निघोज ते देवीभोयरे या परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांचे अपघात झाले आहे. अपघाताला या रस्त्यावरील पडलेले खड्डे कारणीभूत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी वारंवार करुणही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अधिकारी पघ्याची भूमिका घेत आहे. २८ ते ३५ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवून पाटबंधारे खात्याने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करणारा असल्याचा इशारा जनतेतून देण्यात आला आहे.
दिवसभरात हजारोंच्या संख्येने दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्याने ये जा करीत असतात. गेली चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले तर काही ठिकाणी फक्त डागडुजी करण्यात आली. मात्र सध्या या पुर्ण रस्त्यावर विषेश करुण निघोज, जवळा, देवीभोयरे या भागात या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच साईड पट्या हा विषय राहिलाच नाही गेली दोन दिवसांपूर्वी मुलिका देवी विद्यालय परिसर ते कवाद कॅम्प या ठिकाणी एका टेम्पोचा अपघात झाला. खड्यातून जोरदार आदळल्याने दोन ते तीन लोक जखमी झाले आहे.
शुक्रवार दि. ४ रोजी निघोज-जवळा रस्त्यावर एक दूधाचा टॅंकर खड्ड्यांमुळे शेतात गेला. दहा लाख रुपये किंमतीच्या दूधाची नुकसान झाली. वेळच्या वेळी रोड टॅक्स भरीत असून वाहने शासनाचा एक प्रकारे फायदा करीत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम करीत आहेत. खड्डेच खड्डे, साईड पट्या नाहीत यामुळे वारंवार अपघात होत आहेत. यासाठी सध्या कायमस्वरूपी रस्त्याचे काम न करता किमान साईड पट्टा तसेच खड्डे बुजवण्याचे काम केल्यास अपघात टळतील यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे. अन्यथा अहमदनगर-पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनतेतून देण्यात आला आहे.