spot_img
अहमदनगरराज्यात सरकार कोणाचे अन् तुम्ही कोणासोबत ते सांगा?

राज्यात सरकार कोणाचे अन् तुम्ही कोणासोबत ते सांगा?

spot_img

भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे आ. नीलेश लंके यांना जाहीर आव्हान | कामाचे श्रेय घेण्यावरुन कलगीतुरा
पारनेर | नगर सह्याद्री –
MLA Nilesh Lanke राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ट्रीपल इंजिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात पारनेर मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी ४४६ कोटी १० लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. महायुतीचे सरकारमध्ये पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका घेताना संपूर्ण जिल्ह्यातील हजारो कोटी रुपयांची कामे या अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहेत. त्यात पारनेरच्याही कामाचा समावेश आहे. पारनेरला निधी मिळाल्याचे श्रेय तालुक्याचे आमदार घेत असतील तर त्यांनी राज्यात सरकार कोणाचे आहे आणि ते कोणासोबत आहे हे जाहीरपणे सांगावे असे खुले आव्हान भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे [BJP Rahul Shinde] यांनी दिले आहे.

राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे काम शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे करत आले आहेत. अधिक गतीमान प्रशासन या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून विविध योजना तळागाळापर्यंत नेण्याचे काम आम्ही सर्व मंडळी तालुक्यात करत आहोत. राज्य सरकारची प्रतिमा अधिक उजळून निघत असताना जनतेच्या मनात नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी पुन्हा बसावेत ही अपेक्षा निर्माण झाली असल्याचे राहुल पाटील शिंदे यांनी नमूद केले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असताना व त्याच सरकारमध्ये अजित पवार गटाचे आमदार म्हणून सहभागी असताना सातत्याने महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपातील नेतेमंडळींना डिवचण्याचे काम ते  करत आले आहेत. सरकारमध्ये राहून सरकारच्या योजना पदरात पाडून घ्यायच्या आणि त्या योजनांचे श्रेय शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडीला देण्याचे काम आ. लंके हे करत आले आहेत.

याबाबतचे सर्व पुरावे आणि भाषणांच्या क्लीप अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा आम्ही आदरच करत आलो आहोत. मात्र, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने बोलले जात असेल आणि महायुतीला  बदनाम केले जात असेल तर आम्ही देखील जशास तसे उत्तर द्यायला समर्थ असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवार- देवेंद्र फडणवीस यांना भाजप शिष्टमंडळ भेटणार
राज्यात महायुतीत सहभागी असतानाही मतदारसंघात  आ. नीलेश लंके हे सातत्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह केेंद्र सरकारच्या विरोधात आ. लंके यांच्यासह त्यांचे तालुक्यातील समर्थक सातत्याने सोशल मिडियावर बोलत असतात. मोदी सरकारच्या विरोधात बोलताना त्याच सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लावायची आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या विरोधात ओरड करायची अशी दुटप्पी भूमिका त्यांच्याकडून घेतली जात आहे. त्यामुळे आ. लंके यांना आवर घालण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने अजित पवार यांच्याकडे केली जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.  आ. लंके हे नक्की कोणत्या पक्षात आणि कोणत्या नेत्यासोबत आहेत असा प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेचे बिगुल वाजला! ‘या’ तारखेला होणार मतदान? निकाल कधी लागणार? वाचा, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची माहिती एका क्लिकवर..

Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले होते. अखेर...

व्हायचं तेच झालं! पत्रकार परिषद पुढे ढकलली; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद...

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

अहमदनगर । नगर सहयाद्री:- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची...

सुपेकरांच्या व्यवसयाची साता समुद्रापार चर्चा! लाखो रुपयांची उलाढाल, ३०० कुटुंबाला मिळतोय रोजगार

शरद रसाळ । सुपा अहमदनगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील हार फुलांचे दुकाने दसरा...