spot_img
ब्रेकिंगकोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

कोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘अबकी पार 400 पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

अशा तापलेल्या वातावरणात मतदारराजाच्या मनात नेमकं काय? ते एका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हे मधून समोर आलं आहे. राज्यातील जनतेचा मूड काय? मतदार राजा नेमका विचार करतोय काय? याचा निष्कर्ष आता उजेडात आला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या सी-व्होटर सर्वेच्या माहितीनुसार राज्याच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली असून एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना निवडले आहे. तर सहा टक्के लोकांनी दोन्ही नेत्यांना ना पसंती दर्शवली असून उर्वरित चार टक्के लोकांनी उत्तरचं दिल नाही.

महाराष्ट्रा राज्यात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के जनता कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी असल्याचे सी-व्होटर सर्वेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....