spot_img
ब्रेकिंगविधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? 'यांच्या' नावांची राजकीय वर्तुळात चर्चा

विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? ‘यांच्या’ नावांची राजकीय वर्तुळात चर्चा

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
विधान परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीवरुन रणकंदन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोर्‍हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.

सभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्‍यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असं वक्तव्य केलं होतं. विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, यासाठी महायुतीतील ११ घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

विधान परीषद सभापती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक विशेष बैठक पार पडणार आहे. विधान परिषदेतील सदस्य आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधान परीषद सभापती पदासाठी नावं द्या, आम्ही बिनविरोध करतो, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी म्हटलं होते. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेली मुख्यमंत्र्यांची बैठक महत्वाची मानली जात आहे. तसेच सोमवारी घडलेले विधान परीषदेत शिवीगाळ प्रकरण घडले, त्या प्रकरणी देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच, या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा देखील आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...