spot_img
ब्रेकिंगSharad Pawar: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी दिले १९७७ सालचे...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी दिले १९७७ सालचे उदाहरण! एकदा वाचाच..

spot_img

Sharad Pawar: राज्यात विधानसभेचे वारे वाहु लागले आहे.महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी १९७७ सालच्या राजकारणाचे उदाहरण दिले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीची रणनिती स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, आम्ही विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडणार आणि त्या बदल्यात लोकांची मतं मागणार आहोत. हे करत असताना आम्ही आमच्यासारखे विचार असणाऱ्या इतर पक्षांना, संघटनांना आमच्याबरोबर घेणार आहोत. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी (दोन्ही गट) शेतकरी कामगार पक्ष आणि इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. लोकांचा पाठिंबा मिळवणार आहोत.

यावेळी पत्रकारांनी त्यांना तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? असा सवाल केला. त्यांवर पवार म्हणाले, आम्ही निवडून आलो तर एकत्र बसून निर्णय घेऊ आणि एक सक्षम नेता राज्याला देऊ. मी तुम्हाला १९७७ सालचं उदाहरण देईन. आणीबाणीनंतर देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेने समविचारी पक्ष एकत्र आले आणि निवडणुकीला सामोरे गेले.

लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. आम्ही जेव्हा लोकांकडे मतं मागितली तेव्हा मोरारजी देसाई हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते. आम्ही कधीही लोकांना सांगितलं नव्हतं की अमुक नेता आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल. तरीदेखील लोकांनी आम्हाला शक्ती दिली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी देश चालवला. आमचा पूर्वीचा अनुभव आहे.

मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...