spot_img
अहमदनगर'शहरातील व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट करा' कोणी केली मागणी? पहा..

‘शहरातील व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट करा’ कोणी केली मागणी? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर शहरातील व्यावसायिक इमारतीचे मनपा प्रशासनाने फायर ऑडिट करण्यात यावे, या मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने मनपा उपायुक्त यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकडे यांनी दिले. याप्रसंगी वाहतूक सेनेचे विभाग संघटक अमोल गोरे, विभाग अध्यक्ष सनी भुजबळ, उपविभाग अध्यक्ष ओंकार जगदाळे, विशाल भटेजा, मोहित कुलकर्णी, समर्थ मुर्तडक, ऋषी सोनवणे, उदित सूर्यवंशी आदि उपस्थित होते.

नुकतेच पत्रकार चौकातील एक व्यावसायिक दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. परंतु नगर शहरात आतापर्यंत बर्‍याच आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाकडून व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट होत नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

भविष्यात अशा प्रकारची आग लागून जिवीत हानी होऊ शकते, मनपाने या संदर्भात जर कुठलेही ठोस पाऊल उचलून प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर मनसेेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...