spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण?; काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने ठोकला दावा, कोणी केली...

आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण?; काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने ठोकला दावा, कोणी केली मागणी पहा …

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने नेतेमंडळींकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु झाली आहे. लोकसभा मतदारसंघात मिळालेले प्राबल्य व मतदारसंघात असलेली ताकद या धोरणावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे स्थानिक पदाधिकारी व नेतेमंडळी मतदारसंघावर दावा करत आहेत. त्यातच नगर शहर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस यांच्याकडून दावा सांगितला जात असतांनाच आता शिवसेना ठाकरे गटाकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. याबाबत दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव युवासेनेचे महासचिव विक्रम राठोड यांच्यासह शिष्ठमंडळाने पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची शुक्रवारी मुंबई येथे भेट घेतली.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके विजयी झाले. लंके यांच्या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी तीन महिन्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी चालविली आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या आमदार संग्राम जगताप करत आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. महायुतीतमध्ये नगर शहर विधानसभा मतदासंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार यांनाच जाईल असे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपसह शिवसेना शिंदे गटातातील अनेकांनी विधानसभा लढविण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून अ‍ॅड. अभय आगरकर, भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत आहेत.

तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे नावे चर्चेत आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम यांची नावे चर्चिले जात आहेत. काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रबळ दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तयारी चालविली आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या अगोदर २५ वर्ष नगर शहर मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. स्व. अनिलभैय्या राठोड यांनी येथून २५ वर्ष प्रतिनिधीत्व केले. चार वेळा महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. २०१९ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले. गत विधानभा निवडणुकीत राठोड यांचा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिकांनी एक दिलाने काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेतले.

तसेच लंके यांच्या विजयात शिवसेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे विधानसभेला नगर शहर मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे महासचिव विक्रम राठोड यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असून यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, मंदार मुळे, शुभम मीरांडे उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...