spot_img
आरोग्यगायीचं की म्हशीचं? कोणतं तूप आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर...

गायीचं की म्हशीचं? कोणतं तूप आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर…

spot_img

नगर सह्याद्री टीम :
आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुपाचे फायदे सांगणार आहोत. तूप खाण्याचे शौकीन तुम्ही असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न तर नक्कीच आला असेल, ‘सर्वात फायदेशीर तूप कुणाचे ? गाय की म्हैस?’ तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे.

न्यूट्रीशनिस्ट काय म्हणतात

तज्ज्ञ न्यूट्रीशनिस्ट हिमांशू राय सांगतात की, साधारणपणे गाईचे तूप आणि म्हशीचे तूप दोन्ही चांगले असतात, पण गाईच्या तुपाच्या सेवनाने अधिकाधिक आणि चांगले आरोग्य फायदे मिळतात. गाईच्या तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि के, कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम आणि फॉस्फरस तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात, एवढेच नाही तर गाईच्या तुपात ओमेगा 9 फॅटी अॅसिडही असते.

 म्हैस आणि गाईचे तूप यात फरक

– म्हशीच्या तुपामध्ये गाईच्या तुपापेक्षा जास्त चरबी असते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी म्हशीचे तूप उत्तम आहे, तर गाईचे तूप कमी चरबीयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

– गाईच्या तूपात ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते, त्यामुळे त्याचा रंग पिवळा असतो, तर म्हशीच्या तूपाचा रंग पांढरा असतो.

– आयुर्वेदिक औषधांमध्ये म्हशीच्या तुपाच्या तुलनेत गाईचे तूप डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते.

गाईच्या तुपाचे फायदे

वजन कमी करण्यास उपयुक्त

डोळ्यांसाठी फायदेशीर

पोटाची उष्णता शांत करण्यास उपयुक्त

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

मायग्रेन किंवा डोकेदुखीच्या समस्येपासून आराम

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

म्हशीच्या तुपाचे फायदे

वजन वाढण्यास उपयुक्त

याच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

मानसिक आजार बरे करण्यासाठी फायदेशीर.

म्हशीचे दूध स्मरणशक्ती सुधारते.

हे वात दोष संतुलित करते.

पचनाचे विकार दूर होतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...