spot_img
अहमदनगरकुठे निघाले..? आमच्याकडे हाऊसफूल!! आमदार 'थोरात' यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री 'विखे' यांची जोरदार...

कुठे निघाले..? आमच्याकडे हाऊसफूल!! आमदार ‘थोरात’ यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री ‘विखे’ यांची जोरदार टोलेबाजी

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री
प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अनके वर्षात या शहरात साधं स्मारक देखील उभे राहू शकलं नाही. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आता तर त्यांच्या बॅनरवरून सोनिया व राहुल गांधी अचानक गायब झाले आहे. कोण कुठल्या दिशेने चालले हे समजत नाही, आमच्या पक्षाकडे तर हाउसफुल झालंय. अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या संगमनेर शहरात काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असतात.

राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षात या शहरात साधं स्मारक देखील उभे राहू शकलं नाही. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. भाचे ( सत्यजित तांबे) यांना नाशिक पदवीधर संघात उभे करत काँग्रेसच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे सगळ चालत अंधारात.

तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार होता ना. त्यावेळी तुम्ही हात बांधले होते, तोंड नव्हतं बांधला ना? आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका करतात. अत्ता तर लागणाऱ्या बॅनर वरून अचानक सोनिया व राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसत आहे. कोण कुठल्या दिशेने चालले हे समजत नाही, आमच्या पक्षाकडे तर हाउसफुल झालंय. असे महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...