spot_img
अहमदनगरAhmednagar: नगर बनतय 'हुक्का हब'! 'त्या' हुक्का पार्लरवर धाड

Ahmednagar: नगर बनतय ‘हुक्का हब’! ‘त्या’ हुक्का पार्लरवर धाड

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री –
शहरातील तरुणाईमध्ये हुक्का ओढण्याची क्रेझ वाढली आहे. महाविद्यालय विद्यार्थी देखील यात अडकले आहे. शहरात असलेल्या अशा अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईमुळे हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी हुक्का पार्लर चालविणारा फैजान कुतुबुद्दीन जमादार (वय २० रा. दर्गा दायरा रस्ता, मुकुंदनगर) याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर यांनी फिर्याद दिली आहे. गुलमोहोर रस्त्यावर

सुरभी हॉस्पिटलच्या बाजूला आई कृपा जारच्या दुकानाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजू जाधव, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने पंचासमक्ष सदर हुक्का पार्लरवर छापा टाकला असता हुक्का पार्लरचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. सदर हुक्का पार्लर चालविणारा फैजान कुतुबुद्दीन जमादार (वय २० रा. दर्गा दायरा रस्ता, मुकुंदनगर) याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...