Lok Sabha Election 2024: भारताचं पंतप्रधानपद सलग तिसऱ्यांदा भूषविण्याची ऐतिहासिक संधी नरेंद्र मोदींना मिळणार, की नाही हे जून महिन्यात स्पष्ट होईल. दशकभर सत्तेत राहिल्यामुळेच मोदींचा सर्वत्र प्रभाव दिसून येतो.लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
वाराणसीमध्ये निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विजयाच्या हॅट्रिकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
वाराणशी लोकसभा मतदार संघात अर्ज दाखल करण्याचा कालावधी ७ मे ते १४ मे इतका आहे. पंतप्रधान मोदी १३ मे रोजी संध्याकाळी वाराणसीकडे प्रस्थान करणार आहे. वाराणसी महाविजयासाठी १४ मी रोजी भव्य रोड शो करत पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.