spot_img
तंत्रज्ञानआता विना इंटरनेटशिवायही चालणार 'Whatsapp': 'हे' फीचर तुम्हाला माहित आहे का? जाऊन...

आता विना इंटरनेटशिवायही चालणार ‘Whatsapp’: ‘हे’ फीचर तुम्हाला माहित आहे का? जाऊन घ्या सविस्तर..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
व्हॉट्सअॅप लवकरच नवीन फीचर लाँच करणार आहे ज्यामुळे इंटरनेटशिवाय फाइल्स शेअर करणे शक्य होणार आहे. मेटा कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात, आणि व्हॉट्सअॅपमुळे कोणतीही माहिती सहजपणे मिळवता येते. इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅपद्वारे कोणताही मेसेज ट्रान्सफर करणे शक्य नसते. परंतु आता इंटरनेटशिवायही फाइल ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांना कोणताही चित्रपट किंवा मोठी फाइल पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. हे फीचर आयफोनच्या एअरड्रॉप फाइल शेअरिंग फीचरप्रमाणे काम करेल.

व्हॉट्सअॅप नवीन फाइल शेअरिंग फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर इंटरनेटशिवाय फाइल पाठवण्यासाठी मदत करेल. या फीचरमुळे फोटो, व्हिडिओ, फाइल शेअर करणे सोपे होणार आहे. WhatsApp च्या या फीचरमध्ये क्यूआर कोडचा वापर केला जाईल.

त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून फाइल ट्रान्सफर करता येईल. अनेकदा मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इंटरनेटशिवाय फाइल ट्रान्सफर करणे सोपे होईल. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन असेल, ज्यामुळे युजर्सच्या गोपनियतेचे पालन केले जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...