अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर येथील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विद्यार्थिनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित खरडे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अहिल्यानगरच्या शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये अमित खरडे वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहत होता. विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत गप्पा मारत बसलेले फोटो त्याने काढले होते. हे फोटो विभागप्रमुखांना दाखवून तुमचे शैक्षणिक नुकसान करेल अशी धमकी आरोपी विद्यार्थिनींना देत होता. वर्कशॉपमध्ये दोघींना बोलावून त्याने त्यांच्या विनयभंग केला. तसंच ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती.
फोटो विभाग प्रमुखाला दाखवले तर परीक्षेला बसवण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम देऊन यातून मार्ग काढायचा असेल तर माझ्या जवळ बसा असे सांगितले. त्यानंतर त्याने या विद्यार्थिनींच्या शरीराला घाणेरड्यापद्धतीने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. फक्त एकाच नाही तर दोन मुलींसोबत त्याने हे कृत्य केले.
ही घटना त्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर तिने थेट ११२ क्रमांकाला फोन करून घडलेली घटना सांगितली. ही घटना समजतात कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम अमित खरडेला ताब्यात घेतले. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.