spot_img
ब्रेकिंगमाजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकरूखे, रांजणगाव खुर्द, बाकडी आणि जळगाव येथे बुब कमिटी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुकुंदराव सदाफळ, ओंकार भवर, देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शोभाताई घोरपडे, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र लहारे, कविता लहारे, संपतराव शेळके, भाऊसाहेब शेळके, रंजना लहारे, रोहिणी आहेर आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक रुपयात पीकविमा योजना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदान दिले आहे.

जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून मोठी रोजगार निर्मिती होणार असून खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...