spot_img
अहमदनगरघरपट्टीत दिलासा, कचरा, अग्निशमन शुल्कात वाढ.! नव्या आर्थिक वर्षाच्या ठरावात काय-काय? वाचा...

घरपट्टीत दिलासा, कचरा, अग्निशमन शुल्कात वाढ.! नव्या आर्थिक वर्षाच्या ठरावात काय-काय? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये या वर्षी वाढ न करता प्रशासकांनी दिलासा दिला असला तरी कचरा संकलन शुल्क, अग्निशमन शुल्क व सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाचे भाडे, दंडाच्या रकमा, रक्त पिशव्यांचे दर मात्र वाढवण्यात आले आहेत. घरातील कचरा संकलनासाठी प्रतिवर्षी २४० ऐवजी ४८० रुपये, तर व्यावसायिक आस्थापनांना वार्षिक २४०० ते १२ हजार रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे. महासभेत झालेल्या ठरावानुसार नव्या आर्थिक वर्षात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली घरपट्टी व पाणीपट्टीची दर वाढ होण्याची शयता होती. मात्र, हे दोन्ही महत्त्वाचे कर वगळता उर्वरित सेवा शुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार विविध शुल्क, परवाने, दाखले, सेवा, नोंदणी, भाडे व नक्कल फी मध्ये वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२४ पासून ही वाढ लागू करण्यात आल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले.

विविध सेवा, दंडाचे नवील शुल्क पुढीलप्रमाणे – कचरा संकलन सेवा शुल्क (मासिक) : निवासी घरे – ४० रुपये, व्यावसायिक आस्थापना – २०० रुपये, औद्योगिक – २०० रुपये, उपहार गृह व हॉटेल – ५००, पोल्ट्रीज, नर्सिंग होम – ५०० रुपये, मंगल कार्यालय, सभागृह, सिंगल स्क्रीन चित्रपट गृह – ५०० रुपये, खरेदी केंद्र, मल्टिस्क्रीन चित्रपट गृह – १ हजार रुपये, रुग्णालये : ५० खाटापेक्षा कमी – ५०० रुपये, ५० खाटापेक्षा जास्त – १००० रुपये, शैक्षणिक, धार्मिक संस्था, वसतिगृह, शासकीय व निमशासकीय कार्यालये – ५०० रुपये, फेरीवाले – १०० रुपये. घनकचरा विभागाच्या इतर सेवा शुल्क – सेप्टिक टँक उपसणे – मनपा हद्दीत : ६५० रुपये, हद्दीबाहेर : एक टाकी १२०० रुपये व येण्याजाण्यासाठी ३५ रुपये प्रति किलोमीटर. फिरते शौचालय – ७५० रुपये प्रति दिवस. खासगी सेप्टिक टँक उपसा करणारी वाहने – मनपात वाहनाची नोंद करणे – १ रुपया, मनपास रॉयल्टी – ५०० रुपये प्रति खेप. घनकचरा विभाग दंड दर – लघुशंका – २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे – १०० रुपये, उघड्यावर शौच – ५०० रुपये, उघड्यावर कचरा टाकणे – ३०० रुपये, रस्त्यावर पाणी टाकणे – २०० रुपये, बायोमेडिकल वेस्ट टाकणे – १०,००० रुपये, कचरा विलगीकरण न करणे – ५० रुपये, डस्टबीन न ठेवणे – ५० रुपये, बांधकाम, पाडकामाचे साहित्य टाकणे – १०,००० रुपये व प्रतीब्रास ६०० रुपये, मनपाच्या एफएसटीपी प्रकल्पाव्यतिरिक्त इतर ठिकाणी, ओढे – नाल्यात सेप्टिक टँक वाहन खाली केल्यास – १०, ००० रुपये.

अग्निशमन सेवा विविध शुल्क – महापालिका क्षेत्र : ना हरकत दाखला शुल्क – २ हजार रुपये, दाखला नुतनीकरण – २ हजार रुपये, स्टँड बाय ड्युटी – ८ हजार रुपये (२४ तासांपर्यंत), आग विझवणे दाखला शुल्क – १ हजार रुपये. महापालिका क्षेत्राबाहेर : ना हरकत दाखला शुल्क – ३ हजार रुपये, दाखला नुतनीकरण – ३ हजार रुपये, स्टँड बाय ड्युटी – १० हजार रुपये १२ तासांपर्यंत व त्यापुढे प्रतीतास ५०० रुपये, आग विझवणे दाखला शुल्क – २ हजार रुपये, फायर कॉल चार्जेस – १० हजार रुपये १२ तासांपर्यंत व त्यापुढे प्रतीतास ५०० रुपये. इतर विविध सेवा शुल्क – रेकॉर्ड विभाग : महासभा, स्थायी समिती, बांधकाम परवानगी व इतर सर्व प्रकारच्या ठरावाची नक्कल काढणे ४० ऐवजी २०० रुपये, प्रत्येक वर्षासाठी शोधणावळ फी – २०० रुपये. सावेडी जॉगिंग ट्रॅक भाडे : ११,८०० रुपये प्रति दिवस (जीएसटीसह). मनपा रक्तपेढीतील रक्तपिशवी दर – व्होल ब्लड – ५५० रुपये, पॅड रेड सेल – ५५० रुपये, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा – १५० रुपये, प्लारेलेट कॉन्संट्रेट – ४५० रुपये, सिंगल डोनर प्लेटलेट – ४५०० रुपये, क्रीओप्रीसीपीटेट – १०० रुपये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...